सरकारी कर्मचाऱ्याने लाच मागणे हे काही नवीन नाही . कारण लाच अघेतल्या शिवाय कोणतेही काम होत नाही हे तेवढेच सत्य आहे . अनेक अधिकारी ते शिपाई हे दहा रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत लाच घेताना आढळून आले आहे . मात्र अहमदनगर मधील एमआयडीसी मध्ये एकच खळबळ उडाली आहे कारणही तसेच आहे . याठिकाणी सहाय्यक अभियंत्याने ठेकेदाराला चक्क एक कोटीची लाच मागितली होती .
याबाबत सविस्तर वृत्त असे कि अहमदनगर येथील महाराष्ट्र औद्योगिक प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाच्या सहाय्यक अभियंत्याला तब्बल एक कोटींची लाच घेताना नाशिक येथील लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिनांक ३ शुक्रवारी रोजी रंगेहात पकडले.अमित गायकवाड (वय 32 वर्ष,रा.नागापूर ) असे या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे.
नगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत ठेकेदाराने १०० एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे सुमारे २ कोटी ९९ लाख रुपये बिल हे बाकि होते. या बिलाची ठेकेदाराने मागणी केली असता मागील तारखेचे बिल आउटवर्ड करून त्यावर तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ यांची सही घेण्यासाठी गायकवाड यांनी ठेकेदाराकडे चक्क एक कोटींच्या लाचेची मागणी केली.दरम्यान ठेकेदाराने नाशिक येथील लाच प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधल्यावर हि सर्व माहिती संगीतली . ठरल्याप्रमाणे ही रक्कम शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नगर- छत्रपती संभाजी नगर रोडवरील शेंडी बायपास येथे स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार गायकवाड हे रोडच्या बाजूला असलेल्या आनंद सुपर मार्केटच्या मोकळ्या जागेत आला आणि त्याला त्याठिकाणी त्याला लाच स्वीकारताना नाशिक येथील पथकाने रंगेहात पकडले. त्याला ताब्यात घेऊन शासकीय विश्रामगृहात आणण्यात आले.रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. या प्रकरणी गायकवाड यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई नाशिक येथील लाच प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या पथकाने केली आहे .
एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी रोजी पहाटे तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ व सहाय्यक अभियंता अमित गायकवाड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून पुढील तपस सुरु आहे .