जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांची महायुतीला साथ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव :- जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित मेळाव्यात महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा संकल्प उद्योजकांनी केला आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांमार्फत आयोजित उद्योजक मेळाव्यात सहभागी होऊन उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी उद्योजकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने समजातील सर्व स्तरातील नागरिकांचे मते,विचार जाणून घेण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी गाठीभेटी घेत आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या जाणून घेत त्यावर मार्ग काढण्यासाठी महायुतीने उद्योजक मेळावा आयोजित केला होता.
राज्याचे ग्रामविकासमंत्री मा. गिरीशभाऊ महाजन व जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी उद्योग व्यवसायात भेडसावत असलेल्या समस्या,अडचणी जाणून घेतल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार निर्मितीस प्राधान्य दिले असल्याने उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. यामुळे जिल्यातील उद्योजकांनी स्मिताताई वाघ यांच्या विजयाचा संकल्प करीत उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या, अडचणी सोडविण्याची मागणी केली.
यावेळी उद्योजकांना संबोधित करत त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन मंत्री गिरीश भाऊ महाजन व आ.राजूमामा भोळे यांनी उद्योजकांना दिले.
यावेळी सर्व उद्योजकांनी महायुतीच्या उमेदवार व मा. नरेंद्रजी मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी मतदानरूपी साथ देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी ग्रामविकास मंत्री मा. गिरीषभाऊ महाजन, मा. आमदार राजूमामा भोळे, उज्वलाताई बेंडाळे, अरुणदादा बोटोले, कवरलालजी संघवी, डॉ. राधेश्याम चौधरी, कांतीलालजी सानप, केतकीताई पाटील, सुनिलजी वेठ साहेब, रावजी लठा, समीरजी साने, संतोषजी रगडे, बंडूदादा काळे, चंद्रकांतदादा बेंगळे, अरविंदभाऊ देशमुख, किशोर ठाळे यांसोबत सर्व उद्योजक व महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS