Euthanasia Female Judge ; देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही नवीन नाही .या देशात अनेक घटना दररोज आपण एकत असतो कि महिला तर सोडाच या ठिकाणी लहान मुली देखील सुरक्षित नाही . एखाद्या ठिकाणी घटना घडली तर आपण न्यायालयात धाव घेतो मात्र आता महिला न्यायाधीशच सुरक्षित नाही तर देशातील इतर महिलांचे काय .
हि घटना आहे उत्तर प्रदेशमधील या ठिकाणी एका महिला न्यायाधीशांनी थेट सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहले आणि त्यांनी मागणी केली आहे ती म्हणजे आपल्या इच्छामरणाची. त्याला करणहीन तसेच आहे , त्यांचा ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी त्यांचा लैंगिक छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे . त्यांनी सांगितले कि , सीजेआय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरचिटणीस अतुल एम. कुर्हेकर यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून स्टेटस रिपोर्ट मागून घेण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा न्यायाधीशांनी आपल्याला रात्री बोलावली जाते असा दावा त्यांनी केलेलाआहे .
अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे यासंदर्भात त्यांनी तक्रार करून मुख्य न्यायाधीश आणि प्रशासकीय न्यायाधीशांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच या पत्राच्या शेवटी त्यांनी आपलया इच्छामरणाची मागणी केलेली आहे. संविधानाच्या कलम २१ अन्वये माणसाला जसा जगण्याचा अधिकार आहे. आणि तसा सन्मानाने मरण्याचा देखील अधिकारही आहे, असंहि त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
महिला न्यायाधीशांचं हे पत्र सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. या महिला न्यायाधीशांची बांदा जिल्ह्यात बदली झालेली आहे. दरम्यानच्या या काळात जिल्हा न्यायाधीश आणि त्यांच्या नातेवाईकांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. तसेच या महिला जिल्हा न्यायाधीशांना रात्री भेटण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात होता , असा आरोप महिला न्यायाधीशांनी या पत्रात केलेला आहे. यासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार देखील केली होती. मात्र त्यांची साधी चौकशीही करण्यात आली नाही. तक्रारीनंतरही कारवाई होत नसल्यामुळे आपण हे पत्र सीजेआय यांना लिहित असल्याचं म्हटलं आहे. जर या देशात एक महिला न्यायाधीश सुरक्षित नाही तर इतर महिलांच काय .