शेठ ला.ना.सा.विद्यालयात शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी कार्याध्यक्ष कै. ॲड.अ.वा.अत्रे यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगांव (sakshidar news ) ; – येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सा.विद्यालयात शनिवार दिनांक 29 जून रोजी सकाळी 8 ते 11 दरम्यान संस्थेचे माजी कार्याध्यक्ष कै.ॲड.अ.वा.अत्रे यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

- Advertisement -

या कार्यक्रमाच्या सुरवातीस संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.श्री.सुशीलदादा अत्रे ,चिटणीस श्री.अभिजित देशपांडे ,सन्माननीय संचालक श्री. पारसमल कांकरिया,श्री.कवरलाल संघवी,श्री.श्रीनाथ देवकर,रजनी पाठक तसेच गुरूवर्य ॲड.अ.वा.अत्रे प्रतिष्ठान चे सन्माननीय अध्यक्ष ॲड.श्री.अशोक माथूरवैश्य ,सचिव ॲड.श्री.सुधीर कुलकर्णी, ॲड.श्री.पंकज अत्रे, ॲड.श्री.देशपांडे,आदींच्या हस्ते संस्थेचे माजी कार्याध्यक्ष ॲड.बाबासाहेब अ.वा.अत्रे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अपर्ण करून आरोग्य शिबिराचे उदघाटन करण्यात आले.या प्रसंगी सिव्हिल हॉस्पिटल,जळगांव व राष्ट्रीय बाल आरोग्य कल्याण विभाग यांच्या तर्फे उपस्थित डॉ.लोकेश चौधरी,डॉ.शीतल गायकवाड,डॉ. लीना बडगुजर,फार्मसिस्ट स्वाती इंगळे,अझरा पटेल,ए.एन.एम.दीपा भावे यांचे स्वागत संस्थेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व संस्थेचा वार्षिक अंक विवेक देऊन करण्यात आले.या वेळेस शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषधी देण्यात आली.तसेच होतकरू विद्यार्थ्यांना वह्या व पाठ्यपुस्तकं संच मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.यासाठी माजी विद्यार्थी श्री.उल्हास ठाकरे,श्री.कल्पेश जैन,मयुरेश गांगुर्डे तसेच शिक्षक श्री.आनंद पाटील,श्री.हिम्मत काळे,श्री.राजेश महाजन, श्री.योगेश सोनजे,श्री.बापू पाटील आदींचे सहकार्य लाभले.या वेळेस नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित अखिल भारतीय शिव साहित्य संमेलनात शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग किल्ला उत्तमपणे साकारल्याबद्दल मार्गदर्शक शिक्षक श्री.प्रशांत जगताप व श्री .श्रीकांत घुगे यांचा स्मुर्तीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.संजय वानखेडे यांनी केले.हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.सचिन देशपांडे,श्री.प्रशांत जगताप,पर्यवेक्षक श्री .गणेश महाजन व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Orion English Medium State Board शाळेच्या विरुद्ध शिक्षकाचे आमरण उपोषण

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS