माजी खा. ईश्वरबाबूजी जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी दिले “विजयी भव” चे आशीर्वाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

आ. राजूमामा भोळे यांचे गणपती नगर, रामेश्वर कॉलनी भागात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

- Advertisement -

जळगाव (सुनिल भोळे) : – जळगाव जिल्ह्यातील राजकारणात चाणक्य समजले जाणारे माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी, “मग येणार ना मंत्री बनून”अशा शब्दात विचारणा करून महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना मिठाई भरवून विजयासाठी आशीर्वाद दिले. गुरुवारी सकाळी पहिल्या टप्प्यात आ. राजूमामा भोळे यांना गणपती नगर, रामेश्वर कॉलनी भागांमध्ये नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

Eshwarbabuji Jain

- Advertisement -

आ. राजूमामा भोळे यांनी गुरुवारी सकाळी गणपती नगरातील श्री गणपतीचे दर्शन घेऊन पहिल्या टप्प्यातील रॅलीला सुरुवात केली. तेथून गणपती नगर, आदर्श नगर, जीवन मोती सोसायटी, रामेश्वर कॉलनी, विश्वकर्मा नगर, राजपूत गल्ली मार्गे स्वामी समर्थ चौकात समारोप केला. दरम्यान, आमदार राजूमामा भोळे यांनी रॅली मार्गात माजी महापौर प्रदीप रायसोनी, माजी खासदार ईश्वरबाबू जैन, उद्योजक यशवंत बारी, माजी नगरसेविका रेखा पाटील, ज्योती चव्हाण, सदाशिवराव ढेकळे, राजेंद्र घुगे पाटील आदी मान्यवरांच्या घरी भेट दिल्या.

Eshwarbabuji Jain

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनीष जैन यांनी काही काळ प्रचारात सहभाग घेतला. सिंधी समाजाचे प्रार्थनास्थळ प्रेम प्रकाश आश्रम येथे भेट देऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले. महाराजांनी शाल अंगावर टाकून सत्कार करीत आशीर्वाद दिले.

रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, शिवसेनेचे पदाधिकारी माजी महापौर ललित कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी नगरसेवक सदाशिवराव ढेकळे, रेखा पाटील, राजेंद्र घुगे पाटील, शिवसेनेच्या ज्योती चव्हाण, भाजपचे अनिल देशमुख, भाजप मंडळ क्रमांक ८ चे अध्यक्ष महादू सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला महानगराध्यक्ष मीनल पाटील, भाजपचे गौरव ढेकळे, मधुकर ढेकळे, पृथ्वीराज सोनवणे, महेश कापुरे, महेश जोशी, राहुल वाघ, आशुतोष पाटील, राहुल कुलकर्णी, विनोद मराठे, प्रकाश बालाणी, वैशाली पाटील, रेखा कुलकर्णी, शोभा कुलकर्णी, माधुरी देशमुख, शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, पियुष कोल्हे, उमेश सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक लता मोरे, अर्चना कदम, ममता तडवी, शोभा भोईटे, रिपाई (आठवले) गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, अक्षय मेघे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS