BJP Ex-Municipal Servant Murder: धक्कदायक : गोळीबार झालेल्या माजी नगर सेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

BJP Ex-Municipal Servant Murder साक्षीदार न्युज ।१० फेब्रुवारी २०२४। चाळीसगाव भाजपचे माजी नगर सेवक महेंद्र मोरे यांच्यावर कारमधून आलेल्या अज्ञात पाच इसमांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कदायक घटना चाळीसगावात बुधवार दि. ७ जानेवारी रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास हनुमानवाडी येथे घडली होती. यात नगरसेवक महेंद्र मोरे हे गंभीर रित्या जखमी झाले होते . त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले होते. शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान रुग्णालयात महेंद्र मोरेंचा यांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

सविस्तर वृत्त असे कि , या गोळीबार प्रकरणात संशयीय म्हणून अजय संजय बैसाणे (वय ३१ वर्षे, धंदा मजुरी, रा. लक्ष्मी नगर, बसस्टॅन्डच्या पाठीमागे, चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून १) उददेश उर्फ गुडडू शिंदे (रा. हिरापुर), २) सचिन गायकवाड (रा. चाळीसगाव), ३) अनिस शेख उर्फ नव्वा शरीफ शेख (रा.हुडको कॉलनी, चाळीसगाव), ४) सॅम चव्हाण (रा. हिरापुर), ५) भुपेश सोनवणे (रा. चाळीसगाव) ६) सुमित भोसले (रा. चाळीसगाव) ७) संतोष निकुंभ उर्फ संता पहेलवान (रा. हिरापुर) यांच्याविरुद्ध गु.रं.नं ५६/२०२४ भादवि कलम ३०७, १२० (व), १४३, १४४, १४७, १४८, १४९ सह शस्त्रअधिनियम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे . तसेच बैसाणे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पहिल्या पाच संशयितांनी गोळीबार केला तर सुमित भोसले आणि संतोष निकुंभ हे देखील या कटात सहभागी होते, असेही फिर्यादीत नमूद होते. दरम्यान, मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे आता संशयित आरोपींविरुद्ध खुनाचे कलम वाढवले जाणार आहे. मोरेंचा मृत्यूची वार्ता चाळीसगावात समाजात तणावात भर पडली आहे. मोरे यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतात आहे . मोरे यांच्यावर चाळीसगावात अंतिमसंस्कार होणार असल्याचे कळते. तसेच गोळीबार केल्यानंतर मारेकरी ज्या वाहनातून पसार झाले होते, ते वाहन पोलिसांच्या हाती लागले असून. लवकरच मारेकरी देखील गजाआड करणार अशी माहिती पोलिसांनी डेली आहे .

BJP Ex-Municipal Servant Murder

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS