कुटुंबासमोर माजी सैनिकाच्या धारदार शस्त्राने वार करीत खून !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २८ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना आता नाशिक जिल्ह्यात देखील गुन्हेगारी वाढू लागली आहे. नुकतेच म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हसरुळ-आडगाव लिंक रोड परिसरात भररस्त्यात धिंगाणा घालणाऱ्या दोन तरुणांनी एका माजी सैनिकाचा खून केल्याची घटना सोमवारी (दि.२७) सायंकाळी घडली. या घटनेत रवीदत्त चौबे यांचा खून झाला असून, या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रवी चौबे हे सहकुटुंब कारने जात होते. त्यावेळी दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत होते. त्यांनी आरडाओरड करीत वाहतूक अडवली. त्यामुळे चौबे यांनी दोघांची समजूत घालून त्यांना बाजूला होण्यास सांगितले. मात्र, दोघा संशयितांनी गोंधळ घालून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चौबे यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता एका संशयिताने चौबे यांच्या छातीत धारदार शस्त्राने वार केल्याने चौबे गंभीर जखमी झाले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौबे यांना तत्काळ औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, रवी चौबे हे भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झाले असून, सध्या ते शहरातील एका शैक्षणिक संस्थेत काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS