Chalisgaon drug ; खळबळ : चाळीसगावात ड्रग्स पुरविनाऱ्या ठोकल्या बेड्या !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ८ नोव्हेबर २०२३ | चाळीसगाव पोलिसांनी ड्रग्सवर मोठी कारवाई केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एक तरुण चक्क मालेगावातून चाळीसगाव शहरात ड्रग्स पुरवीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी २० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम क्रिस्टल एमडी (ड्रग्स) जप्त केले असून संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास करण्यात आली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरात क्रिस्टल एमडी नामक ड्रग्स विक्री होणार असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पथकाला शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने शेख मोहम्मद उर्फ शादाब मोहम्मद जमील (वय २३, रा. ४ था माळा समरू बाग, तेली चाळ हसन शेठ बिल्डींग, भिवंडी, ता. ठाणे ह.मु. साठ फुटी रोड, पॉवर हाऊस, जिरे बाबा दर्गा, मालेगाव) हा दुचाकीवर क्र (एम. एच. ४९ ए.एच ७७५) संशयितरित्या फिरतांना दिसून आला.

यामुळे शेख मोहम्मदवर संशय आल्यावर त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ २० हजार २४० रुपये किमतीचे क्रिस्टल एमडी (ड्रग) अमली पदार्थ मिळून आले. शहरात कारवाई करताना निवडणूक नागव तहसीलदार संदेश निकम व कर्मचारी उपस्थित होते. संशयितास पोलिस पथकाने ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विनोद भोई, पोहेकॉ पंढरीनाथ पवार, पोहेकाँ राहुल सोनवणे, पोहेकॉ संदीप पाटील, चापोहेकॉ नितीन वाल्हे, पोना मुकेश पाटील, पोना महेंद्र पाटील, पोना भुषण पाटील, पोकॉ रविंद्र बच्छे, पोका ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ महेश बागुल, पोका संदिप पाटील, पोक आशुतोष दिलीप सोनवणे यांनी केली आहे.

Chalisgaon drug

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS