साक्षीदार | १२ नोव्हेबर २०२३ | आज दिवाळीची देशभर धामधूम सुरु असतांना उत्तरप्रदेशच्या कानपुरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कानपुर रेल्वे स्थानकाजवळ कानपूर- झाशी मार्गावर दोघा भावांना भरधाव रेल्वेने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. हे तरुण कानात एयरफोन घालून क्रिकेट सामना पहात होते. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही घटना घडल्याने कुटुंबावर दुखःचा डोंगर पसरला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिवाळीच्या एक दिवस आधी शनिवारी घडली. सुभाष आणि आशिष अशी या दोन्ही तरुणांची नावे असून ते शहापूर गावचे रहिवासी आहेत. इंटरमिजिएट करून दोघेही अग्निवीरची तयारी करत होते. त्यासाठी तो रोज सकाळी रेल्वे रुळाजवळ धावायचे आणि व्यायाम करायचे. शनिवारीही दोघे धावत येऊन रेल्वे रुळावर बसले होते. यावेळी दोघेही कानात मोबाईलवर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील क्रिकेट सामना पहात होते. दोघांच्याही कानात एयरफोन होते. त्यामुळे समोरून रुळावर येणाऱ्या दोन डब्यांच्या आर्मी मेडिकल ट्रेनचा आवाज त्यांना ऐकू आला नाही. त्यामुळे या दोन्ही तरुणांना रेल्वेने जोरदार धडक दिली, ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेच्या वेळी काही अंतरावर उपस्थित असलेल्या गँगमनने सांगितले की, दोन्ही तरुण रेल्वे रुळावर बसले होते. इतक्यात ट्रेन आली. दोघांनाही रुळावरून दूर जाण्यासाठी हाक मारली, पण दोघांनाही आवाज ऐकू आला नाही गँगमनने ही घटना कानपूर झाशी येथे घडल्याचे सांगितले. रेल्वे ट्रॅक सध्या माहिती मिळताच सचेंडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेहांची ओळख पटवून शवविच्छेदनासाठी पाठवली.