साक्षीदार | ११ ऑक्टोबर २०२३ | राष्ट्रवादी फोडून अजित पवारांनी शिंदे व फडणवीसांच्या मंत्रीमंडळामध्ये उपमुख्यमंत्री पद घेतल्यापासून भाजप व देवेद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार गटाचे अनेक नेते नेहमीच टीका करीत असतात आज देखील खा. सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
खा.सुळे म्हणाले कि, देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढते. हे मी म्हणत नाही, तर डाटा सांगतो. नागपूर ही क्राईम सिटी झाली आहे, असं म्हणत सुळे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी शरद पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख, रोहिणी खडसे उपस्थित होते.
पुढचे १२ महिने आपण इलेक्शन मोडमध्ये आहोत. आजच्या बैठकीत त्याबाबत दिशा ठरेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत आले की, काय भूकंप होणार अशी बातमी व्हायची. पण आता पालकमंत्री ठरवण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत येतात, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. समुद्धी महामार्गाने खऱ्याअर्थाने नुकसान झालं आहे. त्याच ॲाडीट करणार आहोत. पुण्यात मेट्रो आली. त्यासाठी हजारो कोटी रुपये उधळले. त्या ऐवजी बसेसची सुधारल्या करता आल्या असता. नागपूरमध्ये मेट्रोत वाढदिवस साजरे होतात. ती मेट्रो लॅासमध्ये आहे. या सरकारच्या काळात शाळा कमी आणि दारुची दुकानं वाढली आहेत, असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला.