back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Fake Sand Invoices : अभियंत्याच्या नावानेच वाळूच्या बनावट पावत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Fake Sand Invoices साक्षीदार न्युज । सुनील भोळे । बोदवड, मुक्‍ताईनगरसह जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यांतील सहा तालुक्यांसाठी फायदेशीर ठरणारे बोदवड उपसा सिंचन योजनेमुळे दुष्काळी भागात गणल्या जाणाऱ्या बोदवडला लाभ होणार आहे. पण योजनेचे काम प्रत्यक्षात कधी घेता येईल याचीच शेतकरी वाट बघत आहे . या योजनेत दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात जुनोने धरण व दुसऱ्या टप्प्यात जामठी धरण आहे. परंतु पहिल्याच जुनोने धरणाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे उघडकीस आले आहे . या संपूर्ण प्रकरणात दोषी आढळून आलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल होणार असल्याचे देखील बोलले जात आहे .

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी कि , सण २०१८ / १९ शासकीय कामासाठी म्हणजे बोदवड उपसा सिंचन या प्रकल्पासाठी शासनाकडून जुनोने तलावासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ७९८६ ब्रास वाळूचा एक गट राखीव ठेवण्यात आला होता . ४८५० रुपये प्रतिब्रास या दराने ३ कोटी रुपये भरल्यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रशासनाने पाटबंधारे विभागाला वाळू उपसा करण्याची परवानगी दिली होती. या वाळू उपसा करण्यासाठी बारकोड असलेल्या १ आणि २ ब्रास मर्यादेच्या वाहतूक पावत्या दिलेल्या होत्या. हि वाळू वाहतूक करतांना या पावत्यांच्या झेरॉक्स करून गैरवापर होत असल्याचो माहिती अजय बढे यांना मिळाल्यावर त्यांनी ह्या संपूर्ण प्रकरणाची माहीती अधिकारात याबाबतची सर्व माहिती मागितल्यावर त्यात मोठ्या प्रमाणत घोळ आढळून आल्याने या संदर्भात अजय बढे यांनी दिनांक २१ /०२ / २०२४ रोजी जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल केलेली होती हे सर्व प्रकरण गंभीर असलेया कारणाने आणि ह्या प्रकरणात बढे हस्ती असल्या कारणाने हे प्रकरण अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्याकडे सोपविण्यात आले होते . त्यांच्याकडून उप विभागीय अधिकारी एरंडोल यांच्या कडे ह्या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली होती .

तब्बल दहा महिन्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती . ही समिती या प्रकरणाची सखोल चौकशी करीत होते आता हि चौकशी पूर्ण झाली असून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे बोलले जात आहे .

- Advertisement -

पाटबंधारे विभागाने बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी तत्कालीन कार्यकारी अभियंत्याच्या नावे वाळू ठेका घेतला होता. या ठेक्यात वाळू घाटावरून बोगस पावत्यांवर क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपसा करण्यात आला आहे. ही अतिरिक्त वाळू शासकीय कामाऐवजी कुठे टाकली याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समितीमार्फत चौकशी सुरू केली आहे. ही माहिती आरटीआयमध्ये उघड झाली आहे.

बोदवड परिसर उपसा योजनेच्या जुनोने येथील तलावासाठी जिल्हा प्रशासनाने ७९८६ ब्रास वाळू राखीव ठेवली. ४८५० रुपये प्रतिब्रास या दराने ३ कोटी रुपये भरल्यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रशासनाने पाटबंधारे विभागाला वाळू उपसा करण्याची परवानगी दिली होती. यासाठी बारकोड असलेल्या १ आणि २ ब्रास मर्यादेच्या वाहतूक पावत्या दिल्या होत्या. त्या पावत्यांच्या झेरॉक्स करून गैरवापर झाला होता . परंतु हा सर्व प्रकार करण्यामागे मास्टरमाइंड नेमका कुणाचा आहे हे देखील तपासले गेले पाहिजे .

अभियंत्याच्या नावानेचा चक्क बनावट पावत्या तयार करण्यात आल्या होत्या या ठिकाणी जेवढा वाळूचा ठेका देण्यात आला होता त्यापेक्षा चार पट वाळू ह्या ठिकाणहून उचल करण्यात आली होती या बाबत माहीत घेतल्यावर जुनोने या ठिकाणी हि वाळू पोहचली नव्हती तर मग हि वाळू नेमकी गेली कुठे आणि हे सर्व वाहतूक सुरु असतांना महसूल आणि संबंधित विभागा काय करीत होता म्हणजेच ह्या दोघांच्या संगणमतानेच झाले असावे हे उघड होत आहे . ज्या ठिकाणी एक ब्रास वाळूसाठी ट्रॅक्टरऐवजी डंपरचा वापर करण्यात आला होता . ह्या संपूर्ण प्रकरणात जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर नेमके काय गुन्हे दाखल होता या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे .

Fake Sand Invoices

तापी पाटबंधारे विभागाचे निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही. डी.पाटील यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

फसवणूक प्रकरणी निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी पाटील यांच्यासह नऊ जणांविरुद्ध  रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Fadnavis Support Pawar, Thackeray | फडणवीसांचा पवार-ठाकरेंना फोन, राजकीय...

Fadnavis Support Pawar, Thackeray | साक्षीदार न्यूज | जगदीप धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी...

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

RECENT NEWS