साक्षीदार | २ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतांना राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळाच्या यादीवरून मराठवाड्यातील शेतकरी पुन्हा संतापलेत. मराठवाड्यात सर्वत्र भीषण स्थिती असतानाही 76 पैकी केवळ 14 तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्याने सरकारला पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवायच्या आहेत का?, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जगू द्यायचे नाही का असा सवाल उपस्थित केला जातोय.
दुष्काळाची नावे कोणत्या आधारावर जाहीर केले. जाहीर केलेल्या त्या तालुक्याच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या तालुक्याची स्थिती का विचारात घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. प्रत्यक्ष पाहणी न करता टेबलावर बसून कागदावर टिपलेला हा दुष्काळ असल्याची चर्चा आता सुरू झालीय.
मराठवाड्यात यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळ परिस्थिती असूनही अनेक तालुक्यांना दुष्काळी तालुक्यांत समावेश करण्यात आलेला नाही. खरिपातील बहुतांश पिके हातातून गेल्यानंतर येणाऱ्या रब्बी हंगामाचीही पाणी नसल्याने शाश्वती नाही. येत्या काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. तरीही शासनाने तालुक्यांना दुष्काळ यादीतून वगळल्याने बळीराजाने रोष व्यक्त केला आहे. मराठवाड्यात यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळ परिस्थिती असूनही अनेक तालुक्यांना दुष्काळी तालुक्यांत समावेश करण्यात आलेला नाही. खरिपातील बहुतांश पिके हातातून गेल्यानंतर येणाऱ्या रब्बी हंगामाचीही पाणी नसल्याने शाश्वती नाही. येत्या काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. तरीही शासनाने तालुक्यांना दुष्काळ यादीतून वगळल्याने बळीराजाने रोष व्यक्त केला आहे.