साक्षीदार | २८ ऑक्टोबर २०२३ | राज्यभरातील अनेक शेतकरी अनेक संकटाना तोंड देत आहे तर अनेक शेतकऱ्यांना पावसा अभावी मूगाचे उत्पन्न घटल्याने त्याचा फारसा फायदा शेतक-यांना हाेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाचे दर वाढल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. शिंदखेडा तालुक्यात मूग, उडीदला प्रतिक्विंटल 12 हजारांच्या आसपास भाव मिळत आहे. यावर्षी अपूर्ण पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना यावेळी चांगले उत्पादन झाले नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत.
यंदा तालुका कृषी विभागाला मुगाचे 4,500 हेक्टर क्षेत्र अपेक्षित होते. त्यात घट होऊन 2,786 हेक्टरच मुगाचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत मुगाची आवक 50 टक्क्यांनी घटली आहे. यंदा भाव मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट म्हणजेच 12 हजारांपर्यंत मिळत आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने मुगाला प्रतिक्विंटल 12 हजार रुपये भाव मिळत असला तरी उत्पादन नसल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नसल्याचेच दिसून येत आहे.