शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांचा रस्त्यात दुर्देवी मृत्यू !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | २१ नोव्हेबर २०२३ | भडगाव तालुक्यातील गुढे गावानजीक एरंडोल-येवला मार्गावर झालेल्या अपघातात भरत काशिनाथ माळी (वय ५२) यांचा दि. १९ रोजी अपघातात मृत्यू झाला. मात्र हा अपघात नेमका कसा झाला, हे कळू शकलेले नाही. दिवाळीनिमित्त घरी पाहुणे आलेले होते. त्यातच माळी हे शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. रात्री पाणी देऊन परत येत असताना त्यांचा अपघात झाला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दि.१९ रोजी रात्री शेतात वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर भरत माळी हे पाणी देण्यासाठी जात होते. त्यावेळी कुटुंबीयांनी त्यांना मनाई केली. मात्र तरीही ते शेतात गेले. त्यानंतर गुढे गावाजवळ विश्वास नगर येथे अपघाताची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यांना उपचारासाठी चाळीसगाव येथे रुग्णालयात नेण्यात , आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्यावर दि. २० रोजी गुढे येथे दुपारी बारा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले मुली असा परिवार आहे. ते गुढे येथील निवृत्ती व सोपान माळी यांचे वडील होत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूच्या डंपरने घेतला...

Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

RECENT NEWS