पारोळा तालुक्यात रत्नापिंपरी शिवधाम फाट्यावर २६ रोजी शेतकऱ्यांचे आंदोलन.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल दि.२२ ( सुरेश पाटील ) ; – शुक्रवार दि. २६ जुलै २०२४ रोजी पारोळा तालुक्यात रत्नापिंपरी शिवधाम फाट्यावर स्व.शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना पारोळा DC कडून निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षाच्या उर्वरित पीक विमा, अवकाळी पाऊस व गारपीटी नुकसान झालेले पिकांची नुकसान भरपाई मिळावी.

- Advertisement -

👉🏽 बिना कागदाने बोलणारा नेता आहे – गुलाबराव पाटील

मागील वर्षी 2023 खरीप व रब्बी तसेच 2024 फेब्रुवारी मध्य खरीप रब्बी हंगामात अवकाळी पाऊस गारपीट तसेच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नसून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना मात्र शासन स्तरावरून कानाडोळा होताना दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून न्याय मिळण्याची मागणी केलेली आहे, मागील वर्षी हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस गारपीट हवेचा वेग अतिवृष्टी अशा कारणांनी शेतकऱ्यांना वेढले होते,अद्याप शासन प्रशासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेला नसून तसेच उर्वरित पिक विमा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याने शुक्रवार दि.२६ रोजी शुक्रवार ११ वाजता पारोळा तालुक्यातील रत्नापिंपरी येथील शिवधाम फाट्यावर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार आहेत.

असे आशयाचे निवेदन पारोळा तहसीलदार तसेच पारोळा कृषी विभाग पारोळा पोलीस स्टेशन पिक विमा प्रतिनिधी यांना देण्यात आले आहे तरी निवेदनाची दखल संबंधित घेणार किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. निवेदन देतेवेळी स्व.शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील,तालुकाध्यक्ष प्रा.भिकनराव पाटील सर,अमळनेरचे शिवाजी पाटील,सुनील पाटील,अनिल पाटील,वाल्मीक पाटील, गुलाबराव पाटील यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी निवेदन देतेवेळी उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS