साक्षीदार | २१ नोव्हेबर २०२३ | किंग खान शाहरुख याचे लाखो चाहते आहे, त्याने नुकतेच पठाण आणि जवानच्या दिमाखदार यश मिळविले आहे तर किंग खान शाहरुख हा आता प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या डंकीमध्ये दिसणार आहे. अशातच त्याच्या लेकीच्या डेब्यूची चर्चा रंगली आहे. ती दिग्दर्शक झोया अख्तरच्या द आर्चिचमधून डेब्यू करणार असून शाहरुखबरोबर देखील चमकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
यंदाचे वर्ष किंग खानसाठी खूपच लाभदायी ठरले आहे. त्याच्या पठाणनं बॉक्स ऑफिसवर हजार कोटींची कमाई केली होती. त्यानंतर जवाननं देखील आठशे कोटींपेक्षा अधिक कमाई करुन नवा विक्रम आपल्या नावावर केला होता. या सगळ्यात शाहरुखच्या लेकीच्या पदार्पणाची चर्चा रंगली आहे. शाहरुख आणि सुहाना हे दोघेजण एकाच चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे बोलले जात आहे. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक सुजाय घोष करणार आहेत.
शाहरुखचा डंकी हा २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून त्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. त्याचे कारण शाहरुख पहिल्यांदाच राजकुमार हिरानीच्या चित्रपटात दिसणार आहे. त्यानं यापूर्वी तीनवेळा हिरानी यांच्या प्रोजेक्टला नाही म्हटले होते. त्यामुळे डंकीची चाहत्यांना उत्सुकता आहे. दुसरीकडे सुहानाचा द आर्चिच नावाचा चित्रपट येत्या ७ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.