इन्स्टाग्रामवर बाप लेकीची बदनामी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १२ ऑक्टोबर २०२३ | यावल तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्याच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करीत त्यावर सदर शेतकरी व त्याच्या मुलीची बदनामीकारक पोस्ट लिहिण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अनोळखीविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्याचा फोटो व नावाचा वापर करून अनोळखी व्यक्तीने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार केले. त्यावर हा शेतकरी व त्याच्या मुलीच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान टाकून त्यांची बदनामी केली. हा प्रकार २३ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान घडला. १० ऑक्टोबर रोजी हा प्रकार संबंधित शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अनोळखी व्यक्तीविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS