Sarpanch Disqualified धरणगाव । साक्षीदार न्युज । तालुकयातील शेरी ग्रामपंचायत निवडणूकीत सर्वसाधारण स्त्री या राखीव आरक्षीत जागेवर सदस्य म्हणुन निवडून आलेल्या होत्या . ग्रामपंचायत शेरी ता.धरणगाव या ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करीता राखीव असल्याकारणाने मागास प्रवर्ग महिला या आरक्षीत जागेवर निवडुन आल्या होत्या . परंतु त्यांनी दिलेल्या मुदतीत आपले जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणुन त्यांना ग्रा.पं. सरपंच व सदस्य यांचे पद रद्द करावे यासाठी अश्विनी नितेश पाटील यांनी अर्ज केला होता वेळेवर आपले जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी त्यांना अपात्र घोषित केले आहे .
याबाबत सविस्तर माहिती असे कि ,अश्विनी नितेश पाटील हे ग्रामपंचायत शेरी ता. धरणगाव, जि. जळगांव येथील रहिवासी आहेत. अर्जदार यांनी विमलबाई चौधरी हया सर्वसाधारण स्त्री या राखीव जागेवर सदस्य म्हणुन निवडून आलेल्या असतांना ग्रामपंचायत शेरी ता.धरणगाव या ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करीता राखीव होते . सरपंचपदाचा निवडणुकीत विमलबाई देविदास चौधरी हया नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षीत जागेवर निवडुन आलेल्या असून त्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख 10.7.20:24 पर्यत होती परंतु त्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणुन त्यांना ग्रा.पं. सरपंच व सदस्य यांचे पद रद्द करावे असा अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आला होता .
सार्वत्रिक निवडणुक ग्रा. पं. शेरी ता.धरणगाव करीता सन 2021 मध्ये निवडुन आलेली असुन सदर ग्रामपंचायत मधील सरपंच पदाची जागा हि नागरिकांचा मागास प्रवर्ग पदासाठी राखीव होतो सदर पदावर विमलबाई चौधरी यांच्याकडे ओबीसी महिला प्रमाणपत्र असल्यामुळे तरी सदर महिला यांना ना.मा.प्र (महिला राखीव) मिळाले व त्यांनी सरपंच म्हणुन दिनांक 5.6.2023 रोजी सरपंच पदाचा कार्यभार स्विकारलेला होता . तरी सदर जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम दिनांक 10 जुलै 2024 अखेर होती परंतु त्यांनी सदर जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही या बाबतीत चौधरी यांचे जात वैधता प्रमाणपत्र तपासुन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केलेली होती .
तहसिलदार धरणगाव गटविकास अधिकारी पंचायत समिती धरणगाव यांचा अहवाल सादर केलेला होता . त्यांनी या अहवालात सांगितले होते कि , शेरी ता. धरणगाव या ग्रामपंचायतीचे सदस्य श्रीमती विमलबाई देविदास चौधरी हया सर्वसाधारण स्त्री या जागेवर निवडून आलेल्या आहेत. त्यानंतर दिनांक 5.6.2023 रोजी झालेल्या सरपंच निवडणुकीत नार्गारकांचा मागास प्रवर्ग महिला या राखीव जागेवर विमलबाई चौधरी सरपंच म्हणुन निवडुन आलेल्या असुन त्यांनी जातवैधता प्रमाणपत्र दिनांक 19.9.2024 रोजी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले होते .
या प्रकरणी दाखल कागदपत्र अहवाल यांचे अवलोकन केले असता सामनेवाले विमलबाई चौधरी रा.शेरी ता.धरणगाव जि. जळगाव हया ग्रामपंचायत शेरीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत दिनांक 05.06.2023 रोजी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षीत जागेवर निवडणुकीत निवडुन आलेल्या असुन त्यांनी सदर दिनांकापासुन दिनांक 10 जुलै 2024 पर्यत यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नसल्याचे निर्दशनास आले आहे .
जिल्हाधिकारी,यांनी विमलबाई देविदास चौधरी यांनी विहीत मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांना या आदेशाच्या दिनांकापासुन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 10-1-अ नुसार ग्रामपंचायत शेरी ता. धरणगाव जि. जळगांव येथील सरपंच म्हणुन राहण्यास विद्यमान ग्रामपंचायतीची मुदत संपुष्टात येण्याच्या कालावधी पावेतो अनर्ह घोषित करण्यात आले आहे .