अखेर अपघातातील कारचालकाविरोधात गुन्हा दाखल 

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १५ ऑक्टोबर २०२३ | रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने वाहन चालवित समोर चालणाऱ्या रिक्षाला धडक दिल्याची घटना दि. ११ रोजी नशिराबाद उड्डाणपुलावर घडली होती. या अपघातात अॅपे रिक्षा उलटून आसमाबी शेख जुबेर अहेमद (वय ३०, रा. बोराखेडी ता. मोताळा जि. बुलढाणा) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी धडक देणाऱ्या कारचालकाविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा तालुक्यातील बोराखेडी येथील शेख सादीक शेख इसा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दि. ११ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ते (एमएच १९ बीयू ५८४३) क्रमांकाच्या रिक्षाने जळगावकडून नशिराबादकडे जात होते. यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच १९ ईए ५१०९) क्रमांकाच्या कारचालकाने रिक्षालाल ागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा पलटून रिक्षा बसलेल्या आसमाबी शेख जुबेर अहेमद या गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले शेख जुबेर अहेमद शेख महेबुब, उमेमा फातीमा शेख जुबेर अहमद व रिक्षा चालक करीम बेग शरीफ बेग हे गंभीर जखमी झाले. जखमींवर उपचार झाल्यानंतर शेख सादीक यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन कार चालक दत्तू सुधाकर कोळी (वय ३९, रा. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन हे करीत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS