Water tariff municipality ; अखेर यावल नगरपालिकेची ती जास्तीची पाणीपट्टी झाली रद्द माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या प्रयत्नाना मिळाले यश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल ( साक्षीदार न्युज ) ; – माजी नगराध्यक्ष यांनी केलेल्या तक्रारीनंतर विस्तारीत क्षेत्रातील नागरीकांना बसणाऱ्या जास्तीच्या पाणीपट्टी भुर्दंड अखेर नगर पालिका प्रशासनाने केली रद्द येथील शहरातील विस्तारित कॉलनी भागात पालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा व्हावा म्हणून व्हावा म्हणून तडवी कॉलनी भागात १०लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात आला आहे . पाणी वितरणासाठी पाईपलाईन सुद्धा टाकलेली आहे. पाणीपुरवठा व्हावा म्हणून त्या भागातील नागरिकांनी अधिकृत रक्कम भरणा करून व आगाऊ वार्षिक पाणीपट्टी शुल्क भरणा करून नळ जोडणी केली होती. मात्र मार्च २०२२पर्यंत पाइपलाइन द्वारे नवीन नळ धारकांना पाणी पुरवठा झालेला नव्हता.

- Advertisement -

अशा ३२८ नळधारकांना पाणीपट्टी शुल्क आकारू नये अशी मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी १७मार्च २०२२ रोजी पत्र देऊन केली होती व ती मागणी मंजूर देखील करण्यात आली होती. त्याप्रमाणे मागील वर्षी नवीन नळ धारकांना कुठलीही पाणीपट्टी न आकारता पालिकेने दिलासा दिला होता. पण यंदा सन २०२३/२४मध्ये पालिकेने पाठविलेल्या पाणीपट्टी बिलात मागील वर्षाची थकबाकी १५०० रुपये+व्याज १२०रुपये व चालु वर्षाचे १५००रुपये असे एकूण ३१२०रू पाणीपट्टी आकारली होती. नागरिकांना पाठविण्यात आलेल पाणीपट्टी शुल्क बेकायदेशीर असुन नवीन नळधराकांवर अन्याय करणारे आहे म्हणून ते रद्द करण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी यांचे कडे दाद मागण्याचा ईशारा अतुल पाटील यांनी दिला होता.

अतुल पाटील यांच्या मागणीनुसार पालिकेने दखल घेऊन थकबाकी सदराखाली देण्यात आलेली रक्कम १६२०रू कमी करण्यात आली असुन तसे पत्र पाटील यांना दिले आहे. सदर पत्रामध्ये विस्तारीत भागातील नवीन ३२८नळ धारकांना सन २०२१/२२चे पाणीपट्टी शुल्क माफ करणेबाबत मा प्रशासक न पा यावल यांनी मंजुरी देऊन मायनेट् प्रणाली सिस्टीम मध्ये समायोजित करून माफ केलेले होते. परंतु शासनाकडून नविन प्रणाली महा यू एल बी सिस्टीम मध्ये माफ केलेले परिणाम दिसुन आले नाही म्हणून ३२८नळ धारकांना मागील पाणीपट्टी व व्याज १६२०रू व चालु सन २०२३/२४ची पाणीपट्टी १५००रू असे एकूण ३१२०रू पाठविण्यात आले होते. ऑनलाईन प्रणाली मध्ये बदल झाल्याने सदरचे बिल चुकून पाठविले गेल्याचे पालिकेने मान्य केले असुन मागील थकबाकी सदराखाली देण्यात आलेले १६२०रू न पा ने नवीन प्रणाली महा यू एल बी सिस्टीम मध्ये कमी करण्यात आले असुन आता फक्त सन २०२३/२४या चालु वर्षाची पाणीपट्टी १५००रू नागरिकांना भरावे लागेल असे म्हटले असुन तसे पत्र अतुल पाटील यांना देण्यात आलेले आहे.

- Advertisement -

विस्तारीत भागातील नवीन नळ धारकांना मागील थकबाकी या सदराखाली १६२०रू जास्तीची पाणीपट्टी पालिकेच्या कर निर्धारण विभागाच्या वतीने आकारले होते. पालिकेची ही मागणी बेकायदेशीर होती. नवीन नळ धारकांना पाणीपट्टी बिल मिळाल्यानंतर जागरूक नागरिकांनी माझ्याशी संपर्क करून सदर बाब माझ्या निदर्शनास आणून दिली होती म्हणून मी तत्काळ पालिकेस पत्र देऊन अवगत केले. त्यानुसार पालिकेने मायनेट प्रणाली ऐवजी महा यू एल बी प्रणाली सिस्टीम मध्ये सदर नळ धारकांचा समावेश करुन तांत्रिक चुकीमुळे पाठविण्यात आलेली थकबाकी रक्कम रद्द केलेली आहे. सजग नागरिक यांचे मुळे हा प्रश्न प्रशासनासमोर मांडता आला व त्याला यश मिळाले. विस्तारीत भागातील ३२८नळ धारक यांचे प्रत्येकी १६००रू रक्कम वाचवता आली म्हणून समाधानी असल्याचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी म्हटले आहे .

Water tariff municipality

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS