Electricity Theft : बारामतीच्या पवारांना ३५ लाखाचा दंड काय आहे प्रकरण पहा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

बारामती पुणे येथील सासवड या ठिकाणी असलेल्या साईनाथ आईस फॅक्टरीला (Sainath Ice Factory) कंपनीत वीजचोरी (Electricity Theft) करतांना आढळून आल्याने या प्रकरणात महावितरण कडून तब्ब्ल 35 लाख 86 हजारांचा दंड आकारण्यात आला होता . आणि हा दंड भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत सुरु करता येणार नसल्याचे सांगत जिल्हा न्यायालयाने साईनाथ आईस फॅक्टरीची वीज पूर्ववत जोडून देण्याचा अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे परिसरातील वीजचोरांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी कि , सासवड येथे असलेल्या साईनाथ आईस फॅक्टरीमध्ये वीजचोरी 6 एप्रिल 2022 वीज चोरीचा प्रकार उघाडकलीस आला होता . त्यामुळे या फॅक्टरीत जवळपास 2 लाख 34 हजार 243 युनीटची चोरी केल्याचे आढळून आले होते . यामुळे त्यांच्यावर 35 लाख 86 हजारांचा दंड आकारण्यात आला होता . हा दंड आकारण्यात आल्यामुळे मालकाने या दंडाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती . मात्र,दिवाणी न्यायालयाने हे बिल कायम ठेवले. त्यांनतर फॅक्टरीचे मालक नारायण दगडू पवार यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणात पवार यांना अटक देखील करण्यात आली होती मात्र जिल्हा न्यायालयातही महावितरणने आकारलेला दंड हा भरावाच लागणार असे सांगण्यात आले होते . आणि दंडाची रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा परावृत सुरु करता येनार नाही . असेही न्यायालयाने सांगितले आहे.

पुन्हा एकदा वीजचोरी…
सदरील प्रकरण हे न्यायालयात सुरु असतांना देखील साईनाथ आईस फॅक्टरीने दुसऱ्यांदा मीटर बायपास मधून वीजचोरी केली. महावितरणच्या पुणे येथील भरारी पथकाने 15 मार्च 2023 रोजी ही वीजचोरी पकडली होती . तेंव्हा नारायण दगडू पवार यांना पुन्हा 22 लाख 32 हजारांचा दंड सुनावण्यात आला . ही रक्कम ग्राहकाने भरली मात्र, पहिल्या चोरीतील दंडाची रक्कम अजून देखील भरलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत संपूर्ण रक्कम भरली जात नाही तोपर्यंत वीजपुरवठा सुरु करता येणार नाही . असा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन ग्राहकाचा अर्ज फेटाळून लावला. या, प्रकरणी महावितरणतर्फे ॲड. सचिन खंडागळे व ॲड. गणेश डिंबळे यांनी बाजू मांडली.

- Advertisement -

दोन न्यायालयात जाऊनही निर्णय राहिला कायम.
साईनाथ आईस फॅक्टरीत तब्बल 2 लाख 34 हजार 243 युनीटची चोरी केल्यामुले 35 लाख 86 हजारांचा दंड महावितरणकडून ठोठवण्यात आला होता. तसेच, वीजपुरवठा देखील खंडीत करण्यात आला होता. या दरम्यान, आपणावर झालेला दंड आणि वीजपुरवठा सुरु करण्याबाबत साईनाथ फॅक्टरीचे मालक नारायण दगडू पवार यांनी दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, दिवाणी न्यायालयाने दंड कायम ठेवलेला आहे . त्यांनतर पवार यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली. परंतु, जिल्ह्य न्यायालयाने सांगितले आहे कि जो पर्यंत मावताराने आकलरलेला दंड भरला जात नाही तो पर्यंत वीज पुरवठा जोडता येणार नाही दांची रक्कम आपणास हि धारावीचा लागणार आहे .

Electricity Theft

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS