साक्षीदार | १२ नोव्हेबर २०२३ | चाळीसगाव तालुक्यातील तमगव्हाण शिवारात शॉर्ट सर्कीटने आग लागून सुमारे साडे पाच एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तमगव्हाण शिवारात संगीता आनंदा सानप यांच्या शेत गट नं १२८ मध्ये साडे पाच एकर ऊसाची लागवड केली होती. हा ऊस तोडणीवर आला असताना शेतातून गेलेल्या वीज प्रवाहाच्या तारांमुळे शॉर्टसर्कीटने आग लागली. ऊसाच्या शेतातून महावितरच्या वीज प्रवाहाच्या तारा गेल्या आहेत. या तारा लोंबकळल्या आहेत. याबाबत शेतमालक संगीता सानप यांचे भाऊ लक्ष्मण सानप यांनी या वीज प्रवाहाच्या तारा बंद करण्याबाबत संभाजी माळी यांना सांगितले होते. त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेतो, असे सांगितले. दरम्यान आज साडेपाच एकर ऊस जळून मोठे नुकसान झाले आहे. याबाबत तळेगाव महावितरणचे इंजिनियर सचिन काटकर यांना विचारले असता त्यांनी या घटनेबाबत जळगाव व चाळीसगाव विभागाला माहिती दिल्याचे सांगितले.