Voting Awareness जळगाव (मदन लाठी ) ; – मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जळगाव जिल्ह्यात शासकीय यंत्रणेमार्फत & विविध शैक्षणिक संस्था आदीं मार्फत जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आहे. .
तशीच जनजागृती आज जळगाव तालुक्यातील भोकर येथील रा. न. लाठी माध्यमिक व हिं. ढो. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात दि १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन आणि मतदान जनजागृती करण्यात आली.
आगोदर झेंडावंदन होऊन विशेष प्राविण्य प्राप्त लहान मुलांचा सत्कार करण्यात आला. आधी झेंडावंदन होऊन राष्ट़गीत म्हणण्यात आले.जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी आणि जळगाव जिल्हा लोकसभा २०२४ मतदान जनजागृती चे आयकॉन आणि मुळ भोकरचे रहिवासी मदन रामनाथ लाठी यांनी मतदानाचे महत्त्व सांगून प्रत्येक घरातील सदस्य, आजु बाजुचे परिसरातील, गल्लीतील सर्वांनी आपले मत हक्क बजवावा ही विनंती केली आणि नंतर सर्वं शिक्षक, विद्यार्थी, संस्थेचे पदाधिकारी आदिंनी शपथ घेतली.

सुरुवातीला ध्वजारोहण मुख्याध्यापक श्री उत्तम चिंचाळे सरांच्या हस्ते करण्यात आले.उपस्थितांमध्ये संस्थेचे चेअरमन श्री प्रवीण चव्हाण, सचिव श्री अरूण भाऊ सोनवणे,,जेष्ठ संचालक श्री सुभाष अप्पा पाटील, ,सुभाष टेलर,भगवान चावडा,अनिल पाटील,अशोक पाटील,अशोक पवार,सामाज सेवक बालासेठ लाठी,एस जे न्हाळदे,माधुरी अहिरे,राखी सुरळकर, राजपुत सर,अमोल पाटील,जोशी सर, आणि इतर ग़ामस्थ उपस्थित होते.