चिलमने ओढत होता गांजा अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २९ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील मेहरुण परिसरात गांजा सेवन करीत असताना आढळून आल्याने सैय्यद नदीम सैय्यद कासीम (वय ३७, रा. तांबापुरा) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरुण परिसरातील तांबापुरा खदानजवळ एक जण गांजा सेवन करीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना शुक्रवारी दि. २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मिळाली. पोलिस कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन खात्री केली असता सैय्यद नदीम सैय्यद कासीम हा गांजा सेवन करीत असल्याचे आढळून आले. त्याच्याजवळून चिलम व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोकॉ किरण पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सैय्यद नदीम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे करीत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS