back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

मतदारसंघाच्या विकासासाठी आ. राजूमामांनी नेहमीच पुढाकार घेतला : विशाल त्रिपाठी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राजर्षी शाहूनगर, जयकिसनवाडी, नवीपेठ भागात रॅलीला भरभरून प्रतिसाद

- Advertisement -

जळगाव (सुनिल भोळे) : – शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा तथा सुरेश भोळे यांनी गेल्या १० वर्षाच्या काळात नेहमी मतदारसंघाच्या विकासासाठी पुढाकार घेतला. त्यांनी शहराच्या विकासासाठी वेळोवेळी निधी मंजूर करून आणला. त्यामुळे अनेक बदल घडून आले. त्यांच्या पाठीशी राहून त्यांना निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी यांनी प्रचार रॅलीदरम्यान संवाद साधताना केले. जळगाव शहरात आ. राजूमामा भोळे यांनी राजर्षी शाहूनगर, जयकिसनवाडी, नवीपेठ भागात शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात रॅली काढली. प्रसंगी जनतेतून भरभरून प्रतिसाद लाभला.

Rajumama

- Advertisement -

राजर्षी शाहू नगर येथील तपस्वी हनुमान मंदिर येथे पूजा करून आ. भोळे यांनी दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली. तेथून शाहू नगर परिसर, कोर्ट चौक मार्गे जयकिसनवाडी, नेहरू चौक, व. वा. वाचनालयमार्गे जिल्हा परिषद परिसरातून चित्रा चौक, नवी पेठेतील कंवरलाल संघवी यांचे घरी समारोप करण्यात आला. मार्गात अनेक तरुणींनी लोकप्रिय उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, रॅलीच्या रस्त्यावर डॉ. आरती हुजुरबाजार, नेहरू चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष अजय गांधी, दिलीप गांधी, माजी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या घरी भेटी दिल्या.

Rajumama

रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, माजी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेनेचे महानगर संघटक ॲड. दिलीप पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख फिरोज शेख, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप मंडळ क्रमांक २ चे अध्यक्ष राहुल घोरपडे, भाजप अल्पसंख्याक महानगराध्यक्ष अशफाक खाटीक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला महानगराध्यक्ष मीनल पाटील, भाजपचे मंडळ अध्यक्ष मनोज काळे, विजय वाडकर, राजू खेडकर, प्रीतम पवार, अजय गांधी, जगदीश जोशी, किशोर देशमुख, प्रमोद वाणी, अमित देशपांडे, महेंद्र गांधी, अजय जैन, रेखा कुलकर्णी, कल्पेश सोनवणे, शिवसेनेचे राहुल नेतलेकर, सोहम विसपुते, शंतनू नारखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्चना कदम, ममता तडवी, शोभा भोईटे, कौसर काकर, रिपाई (आठवले) गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, मिलिंद सोनवणे, प्रताप बनसोडे, नाना भालेराव, अक्षय मेघे, लोक जनशक्ती पक्षाचे मनोज निकम, आनंदा सोनवणे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Rajumama

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS