IPS Om Prakash | माजी आयपीएस अधिकाऱ्याचा बेंगळुरूत संशयास्पद मृत्यू; रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

IPS Om Prakash साक्षीदार न्युज ।  कर्नाटकातील माजी पोलीस महासंचालक आणि 1981 बॅचचे आयपीएस अधिकारी ओम प्रकाश यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारी त्यांचा मृतदेह बेंगळुरूतील एचएसआर लेआउट परिसरातील त्यांच्या निवासस्थानी रक्ताच्या थारोळ्यात आढळला. या घटनेने स्थानिक पोलिसांमध्ये चिंता व्यक्त होत असून, तपासाला वेग आला आहे.

- Advertisement -

प्राथमिक माहितीनुसार, घटनास्थळी ओम प्रकाश यांच्या पत्नी आणि मुलगी उपस्थित होत्या. त्यांच्या शरीरावर जखमा दिसल्याने हत्येचा संशय निर्माण झाला आहे. पोलिसांनी त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, तीच मुख्य संशयित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओम प्रकाश यांच्या पत्नीने पोलिसांना फोन करून मृत्यूची माहिती दिली, त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळ गाठले.

बेंगळुरु शहर पोलिसांनी सांगितले की, ओम प्रकाश हे निवृत्तीनंतर बेंगळुरूत राहत होते. त्यांचा मृतदेह घरात पडलेल्या अवस्थेत सापडला असून, प्राथमिक तपासात घरगुती वाद हे कारण असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला असून, घटनेच्या मागील नेमक्या कारणाचा शोध सुरू आहे. सध्या पोलिस तपासातून अधिक माहिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे.

वर्षाला फक्त २० रुपये खर्च, मिळेल २ लाखांचे संरक्षण; जाणून घ्या मोदी सरकारची ‘ही’ योजना
वकील कुटुंबावर मृतदेहाला मारहाण आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचा आरोप
रोहित पवारांचं आवाहन: ‘फक्त ठाकरे नव्हे, सर्व कुटुंबांनी एकत्र येऊन जपावा महाराष्ट्रधर्म’

IPS Om Prakash

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS