Bus
साक्षीदार | १० ऑक्टोबर २०२३ | राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नेहमीच अपघातामध्ये शासकीय बसचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत अस्ते. अशातच वाशीम बसस्थानकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाशीम बसस्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसचे स्टेअरिंग एका मनोरुग्ण महिलेने ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली.
वाशिम बस स्थानकावर रिसोड जाणारी (बस क्र. MH 06- S 8047) ही बस उभी करुन चालक नोंद करण्यासाठी नियंत्रण कक्षात गेल्यानंतर एक मनोरुग्ण महिला बस च्या केबिन मध्ये घुसली आणि तिने स्टेअरिंगचा ताबा घेतला. त्याच बसमध्ये प्रवाशी बसत असल्याने काही वेळ हा प्रकार कुणाच्या ही निदर्शनास आला नाही. मात्र बस स्थानकावरील एका वाहकाच्या हा प्रकार निदर्शनास आल्या नंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर एसटीचे सुरक्षारक्षक, चालक आणि वाहकाने या महिलेला स्टिअरिंग वरून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अखेर त्या महिलेच्या मुलाने आणि सुरक्षा रक्षकांनी मनोरुग्ण महिलेला बसच्या खाली उतरवले. पण ती काही बाहेर निघायचे नाव घेत नव्हती. आरडाओरड करत होती. तिला लोकांनी उचलून व राग धाक दाखवून तिला खाली उतरण्यास भाग पाडले. पण ती काही ऐकण्यास तयार नव्हती. त्यामुळे अखेर तिने नकार दिला.