साक्षीदार | ४ नोव्हेबर २०२३ | जळगाव तालुक्यातील एका गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला लाकडी काठीने बेदम मारहाण करती जखमी झाल्याची घटना दि.२ नोव्हेबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील शेळगाव येथे मिथुन सुरेश कोळी (वय-३६) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान गुरुवारी २ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून दीपक संजय कोळी, निलेश बाळू कोळी, खुशाल बाळू कोळी आणि संजय रघुनाथ कोळी सर्व रा. शेळगाव ता. जि. जळगाव या चार जणांनी मिथुन कोळी याला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच एकाने हातातील काठी मिथुनच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान जखमी झालेल्या मिथुन कोळी याला नजीकच्या नशिराबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचारानंतर शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मिथुन कोळी आणि दिलेल्या फिर्यादीवरून दीपक संजय कोळी, निलेश बाळू कोळी, खुशाल बाळू कोळी आणि संजय रघुनाथ कोळी यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहे.