यावल ( साक्षीदार न्युज ); – येथील भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांच्या सततच्या पाठपुरावा आणी प्रयत्नांनी व राज्याचे पर्यटन मंत्री ना गिरीषभाऊ महाजन यांनी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान यावलचे प्रसिद्ध श्री महर्षी व्यास महाराज यांच्या मंदिरासाठी व विविध विकास कामांसाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे .
यावल येथील प्रसिद्ध श्री महर्षी व्यास महाराज यांच्या मंदीर हे संपुर्ण देशातील महत्वाच्या तिर्थस्थळांमध्ये या मंदिराचा समावेश असुन ,या ठीकाणी वर्षभर दर्शनासाठी भाविक येत असतात, गुरूपौर्णिमेस या मंदिरावर दर्शनासाठी भाविकांची लक्षवेधी गर्दी होते . या देवस्थानातील विविध विकास कामांसाठी निधी मिळावा यासाठी भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांनी सतत पर्यटन मंत्रायलयाच्या माध्यमातुन व महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री ना गिरीशभाऊ महाजन यांच्या मदतीने पाठपुरावा करीत श्री व्यास महाराजांच्या मंदिर व श्रीराम मंदीर येथे ग्रंथालय , किर्तन सभागृह , संतनिवास, ऑडीटॅारीयम आणी महाप्रसारालय व इतर बांधकाम करणे आदी विकासकामांसाठी शासनाकडून चार कोटी रूपयांचा निधी मंजुर करून आणला असुन याबाबत शासकीय दरपत्रक देखील जारी करण्यात आले आहे . या चार कोटी रुपयांच्या निधीतुन एक कोटी २०लाख रूपयांचा निधी हा जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे . दरम्यान या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी आनंद व्यक्त केला असुन या निधीमुळे श्री महर्षी व्यास महाराजांच्या मंदिराचा व श्रीराम मंदीराच्या अत्यावश्यक असलेल्या कामांना गती मिळाणार असल्याचे नमुद केले असुन , या कामासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना देनेन्द्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , पर्यटनमंत्री ना गिरीष भाऊ महाजन , जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील,आमदार सौ लताताई सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे जावळे यांनी म्हटले आहे .