साक्षीदार | १० नोव्हेबर २०२३ | अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना एक धक्कादायक घटना पुणे शहरातून समोर आली आहे. चक्क ७० ते ८० जणांनी मिळून चार-पाच जणांना मारहाण केली असून यामुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. दगडफेकही झाली असून परिसरातील झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. हि घटना पुण्यातील हडपसर भागात घडली आहे.
- Advertisement -
मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख शेख यांनी वाढदिवसानिमित्त फटाके फोडले होते. त्यावरून बाळासाहेब आवटी यांच्याशी त्यांचा वाद झाला. यानंतर दोन्ही गटात हाणामारीला सुरुवात झाली. अधिक तपास पोलीस करत आहेत.
- Advertisement -