शिव कॉलनीत घरफोडी करणारे चौघे अटकेत !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २१ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील अनेक परिसरात मध्यरात्री घरफोडीच्या घटना सातत्याने घडत आहे. यावर पोलीस प्रशासन आता कारवाई करीत असतांना शिव कॉलनी येथे बंद कराचे कुलूप तोडून घरात ठेवलेले अम्प्लिफायर व साऊंड सिस्टम असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविणाऱ्या चार चोरट्यांना रामानंदनगर पोलिसांनी गुरुवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मेहरूण परिसरातील रहिवासी प्रदीप सुदाम वाणी यांचे शिव कॉलनी परिसरात घरात त्यांनी त्यांच्या मालकीचे अॅम्प्लिफायर व साऊंड सिस्टम मुद्दे ठेवण्यात असा एकूण आला होता. दरम्यान २९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी साऊंड सिस्टिम व अपलिफायर असा एकूण १ लाख ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी गुन्ह्यातील आरोपींच्या शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार पथकाने संशयित आरोपी सागर राजाराम गवळी (वय २९, रा. पिंप्राळा हुडको), अबार अमित खाटीक ( वय १८, रा. उस्मानिया पार्क), समीर शेख इकबाल (वय २२) आणि अमोल प्रकाश शिरसाठ (वय २५) रा. दूध फेडरेशन हुडको या चौघांना अटक करून त्यांच्याकडून चोरी गेलेल्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोली अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावि आणि पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सपकाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुशील चौधरी, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, हेमंत कळस्कर, विनोद सूर्यवंशी, अतुल चौधरी, उमेश पवार आणि रवींद्र चौधरी यांनी कारवाई केली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS