काहीही कारण नसताना चौघांनी केली महिलेला मारहाण !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २९ ऑक्टोबर २०२३ | एका २८ वर्षीय महिलेला काहीही कारण नसतांना चार जणांनी शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील बडी खानकाह जवळ हिना असीफ शहा (वय २८) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता महिलेला कारण नसतांना परिसरात राहणाऱ्या खलील मणीयार, शबीना खलील मणीयार, मुमताज मणीयार, कन्नो मणीवार सर्व राहणार बड़ी खानकाह जवळ, भुसावळ यांनी पाणी भरण्याचे नळीने आणि कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण करून दुखापत केली आहे.

हा प्रकार घडल्यानंतर महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रविंद्र भावसार करीत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS