साक्षीदार | २० नोव्हेबर २०२३
भुसावळ शहरातील आगाखान वाडा भागात एकाच रात्री चार दुचाकी वाहने जळून खाक झाली. या घटनेमागील कारण मात्र समजू शकले नाही. आगाखान वाडा भागात घरासमोर उभी असलेल्या दुचाकी वाहने आग लागून जळून खाक झाली. या मागील नेमकं कारण समजू शकले नाही. बर्निंग बाईकचा हा थरार १८ रोजी रात्री दीड ते तीन वाजेदरम्यान घडला या प्रकरणी बाजार पेठ पोलिसांत अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आगाखान वाडा परिसरातील रहिवासी इमरान शेख सईद कुरेशी (वय ३०) यांच्या तक्रारीनुसार, घराबाहेर उभ्या असलेल्या पल्सर दुचाकीला आग लागल्याची घटना शनिवारी दीड ते तीन वाजेदरम्यान घडली. या आगीत चार दुचाकी वाहने जळाल्याने मोठे नुकसान झाले. तसेच याची झळ बाजूला असलेल्या विद्युत मीटरलाही बसली. या मीटरचेही नुकसान झाले. आग लागली की लावण्यात आली, याचं कारण स्पष्ट झाले नाही. तपास हवालदार जिंतेद्र पाटील करीत आहेत.