साक्षीदार | ३ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक तरुणांचे शिक्षण झाले आहे पण अनेक तरुणांकडे कमी शिक्षण झाल्याने सरकारी नोकरीसाठी संधी नसल्याने आज देखील अनेक तरुण बेरोजगार आहे मात्र आता मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे या भरती साठी चौथी पास ते पदवीधारकांना अर्ज करता येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयांतर्गत असिस्टंट लायब्रेरिअन, स्वयंपाकी, माळी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालय भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक
पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.
पदाचे नाव – असिस्टंट लायब्रेरिअन, स्वयंपाकी, माळी
एकूण रिक्त पदे – ८
शैक्षणिक पात्रता –
असिस्टंट लायब्रेरिअन : कोणत्याही शाखेतील पदवी + लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये सर्टिफिकेट + MS-CIT + ३ वर्षे अनुभव.
स्वयंपाकी : ४ थी पास + स्वयंपाकाचे संपूर्ण ज्ञान व अनुभव.
माळी : ४ थी पास + ३ वर्षे अनुभव.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – २१ ते ३८ वर्षे.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
अर्ज फी –
खुला प्रवर्ग, मागासवर्गीय – २०० रुपये.
नोकरीचे ठिकाण – नागपूर.
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची सुरवात – ३० ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ नोव्हेंबर २०२३
अर्ज करण्याचा पत्ता – प्रबंधक (प्रशासक), मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाईन नागपूर – ४००००१