शासकीय योजनेचा फायदा मिळवून देण्याचे सांगून फसवणूक !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १४ नोव्हेबर २०२३ | भुसावळ शहरातील जवाहर डेअरी जवळ सार्वजनिक जागी (ता.१३) रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास एक अनोळखी इसम याने मिल्लत नगर मधील रहिवासी नसिम अख्तर अब्दुल सुभान शेख यांचा विश्वास संपादन करून शासकीय योजनेचा फायदा मिळवून देत असे सांगत एक लाख बहात्तर हजार रुपयात फसवणूक केल्या प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

माहिती अशी की,मिल्लत नगर मधील रहिवासी नसिम अख्तर अब्दुल सुभान शेख (वय ७५) हे ता.१३ रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान जवाहर डेअरी जवळ सार्वजनिक जागी संशयित आरोपी एक अनोळखी इसम वय अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील तोंडाला रुमाल लावलेला नाव गाव माहिती नाही याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून शासकीय योजनेचा फायदा मिळवून देतो असे सांगून सोबत नेवून फसवणुकीतील एक लाख रुपयांचे दोन सोन्याचे कंगण प्रत्येकी १२.५ ग्रॅम वजनाचे २५ ग्रॅम तसेच बहात्तर हजार रुपये किंमतीची एक सोन्याची चैन १५ ग्रॅम वजनांची व त्यात सोन्याचे पैडल ३ ग्रॅम वजनाचे एकूण १८ ग्रॅम वजनांचा मुद्देमाल त्याच्या प्रवासाच्या बँगत ठेवायला लावून सदरील बँग ही भुसावळ शहरातील जवाहर डेअरी जवळील कटलरीच्या दुकानवाल्याजवळ ठेवायला लावून नंतर येथे पुन्हा येऊन त्या बॅगेतील फिर्यादीचे सोन्याचे दागिने काढून घेऊन फिर्यादीची फसवणूक करून घेवून गेला म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.फौ सत्तर शेख करीत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS