Physiotherapy Day जळगाव । साक्षीदार न्यूज । जागतिक फिजिओथेरपी दिवसानिमित्त रुशील मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रात विशेष मुलांसाठी फिजिओथेरपी ट्रीटमेंटचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टांनी मुलांच्या गरजेनुसार व्यायाम, थेरपी व मार्गदर्शन केले. मुलांच्या शारीरिक क्षमतांमध्ये सुधारणा व्हावी, दैनंदिन हालचाली सुलभ व्हाव्यात यासाठी विविध थेरपी तंत्रांचा वापर करण्यात आला. तसेच पालकांना घरच्या घरी करता येणाऱ्या व्यायामांची माहिती तज्ञांनी दिली.
या उपक्रमामुळे मुलांमध्ये आनंद, आत्मविश्वास आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमासाठी गोदावरी फिजिओथेरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जयंत नागुलकर, डॉ. कृतिका काळे यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉ. साक्षी भारंबे, डॉ. ऋतुजा शार्दुल, डॉ. स्नेहल पाटील, डॉ. शुभम खंडारे, डॉ. नवी अग्रवाल आणि डॉ. प्रथमेश जोशी यांनी मुलांना थेरपी दिली.
फिजिओथेरपिस्टांनी पुढेही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले. तसेच उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रात प्रत्येक शनिवारी मोफत फिजिओथेरपी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी अध्यक्ष हर्षाली चौधरी, धनराज कासट यांच्यासह केंद्रातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमात साधारण ७० विशेष मुलांना मोफत थेरपी देण्यात आली.