पारोळा –येथील पाठक गल्लीतील रहिवासी असलेल्या ५४ वर्षीय प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ रोजी उघडकीस आली. या संदर्भात यशवंत रवींद्र पाटील यांनी खबर दिली की,
- Advertisement -
त्यांचे वडील रवींद्र दगडू पाटील (वय ५४) हे २३ रोजी रात्री ९ वाजता गावातून फिरुन येतो, असे सांगून घरातून निघून गेले होते. रात्री उशीरापर्यंत ते परत न आल्याने शोध घेतला. दरम्यान, २४ रोजी बहादरपूर रस्त्यावरील गोविंद शिरोळे यांच्या शेतातील लिाबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आला. या बाबत पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास प्रवीण पाटील करत आहे.
- Advertisement -