साक्षीदार | २३ ऑक्टोबर २०२३ | भुसावळ शहरासह परिसरामध्ये गावठी कट्टे, काडतूस आढळण्याचे सत्र सुरूच आहे. शनिवारी पुन्हा गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसासह दोन जणांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पु. ओ. नाहाटा चौफुलीवर गावठी पिस्तुलाच्या धाकावर संशयित गुन्हा करण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. यानुसार पथकाने नाहाटा चौफुलीवरून प्रकाश सुभाष धुंदे (नाडगाव, ता. बोदवड) यास अटक केल्यानंतर त्याच्याकडून गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. संशयिताने गावठी पिस्तूल भुसावळ शहरातील तौसीफ अस्लम तडवी याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिल्यानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास केली. पोलिस हवालदाज सूरज पाटील व नाईक संकेत अरुण झांबरे यांनी प्रकाश सुभाष धुंदे (नाडगाव, ता. बोदवड) यास नाहाटा चौफुलीवर अटक केल्यानंतर त्याच्याकडून २५ हजार रुपयांचे गावठी पिस्तूल, दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे, ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी व १० हजार ५०० रुपयांचे दोन मोबाइल फोन असा ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला