गावठी कट्टा घेवून येत होता जळगावात अन पोलिसांनी घेतले ताब्यात !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २८ ऑक्टोबर २०२३ | शिवाजीनगर उड्डाणपुलाकडून शहरात गावठी कट्टा घेऊन येत असलेल्या किरण दिलीप सपकाळे (३४, रा. गेंदालाल मिल) या तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतूसे जप्त केली. ही कारवाई शुक्रवार, २७ ऑक्टोबर रोजी दुपारी करण्यात आली.

- Advertisement -

या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिले. त्यानुसार शुक्रवारी पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार बशीर तडवी, पोहेकॉ विजय निकुंभ, राजकुमार चव्हाण, प्रफुल्ल धांडे, उमेश भांडारकर, संतोष खवले, पोलिस नाईक किशोर निकुंभ, योगेश पाटील, पोकॉ रतन गिते, तेजस मराठे, योगेश इंधाटे यांनी सापळा रचून उड्डाणपुलाजवळून किरण सपकाळे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १० हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतूस जप्त केले. याप्रकरणी पोकों तेजस मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण सपकाळे याच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रफुल्ल धांडे करीत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS