“घराघरात ताई मनामनात ताई, जयश्रीताई जयश्रीताई” ; नव्या उमेदीने जयश्री महाजनांकडे जनतेचं लक्ष…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव (सिंही भोळे) ; – जळगाव शहराच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचाराची धूम सध्या शहरभर दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या वतीने जयश्री महाजन यांच्या समर्थनार्थ आज संभाजीनगर भागात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

- Advertisement -

Gharagharaat Tai Manamanat Tai

रॅली दरम्यान, जयश्री महाजन यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “घराघरात ताई, मनामनात ताई! जयश्रीताई, जयश्रीताई!” असा उत्साही नारा देत नागरिकांनी आपले समर्थन महाजन यांना जाहीर केले. या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

- Advertisement -

Gharagharaat Tai Manamanat Tai

जयश्री महाजन यांच्या प्रचारासाठी आलेल्या या जनसमुदायातून जळगावातील जनतेचे बदलाच्या दिशेने मोठे आशास्थान दिसून येत आहे. शहरातील विविध विकास कामांसाठी नवा चेहरा म्हणून जयश्री महाजन यांच्याकडे पाहिले जात आहे. नागरिकांमध्ये महाजन या बदल घडवून आणतील अशी अपेक्षा बळावली आहे.

Gharagharaat Tai Manamanat Tai

“जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी कटिबद्ध राहीन आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहे,” असे आत्मविश्वासपूर्ण विधान जयश्री महाजन यांनी केले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS