साक्षीदार | १७ ऑक्टोबर २०२३ राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहित महिलांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्कात येत अनेक चुकीच्या घटना मुलीसोबत घडत असतांना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एका गावात हि घटना घडली आहे.
ओळखीतून विश्वास संपादन करत एका तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली. गावानजीक एका हॉटेलमध्ये २२ एप्रिल २०१९ ते ११ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला. तरूणीचे विवस्त्र फोटो काढण्यात आले. लग्नास नकार देताच ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. याप्रकरणी रविवारी पिंपळनेर पोलिस ठाण्यात एका तरुणाविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी शिक्षण घेत आहे. तिच्याशी नवापूर तालुक्यातील तरुणाने ओळख केली. गावाची यात्रा पाटण्यासाठी बोलावन घेतले आणि त्याच्या घरी तरुणीला डांबून ठेवले. तेथे दोन वेळा अत्याचार करण्यात आला. ही बाब पीडित तरुणीने सांगितली. मात्र समाजात बदनामी होईल असे वाटल्याने ही बाब उघड करण्यात आली नाही. यानंतर २१ मे २०२३ रोजी दुपारी कॉलेजच्या वसतिगृहातून बळजबरीने तरुणीला नवापूर येथे आणण्यात आले. एका लॉजवर अत्याचार करण्यात आला. विवस्त्र फोटो मोबाइलवर काढण्यात आले. तरुणीने लग्नास नकार दर्शविल्याने त्याने फोटो, व्हिडीओ व्हायरल करून बदनामी केल्याने रविवारी सायंकाळी सव्वासात वाजता पिंपळनेर पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.