back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

स्वच्छ सुंदर बोदवड शहराच्या निर्माणासाठी सेवेची संधी द्या – रोहिणी खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बोदवड (सुनील भोळे): – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगर मतदारसंघाच्या उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांनी ॲड.रविंद्र भैय्यासाहेब पाटील, उदयसिंह पाटील यांच्या उपस्थितीत बोदवड शहरातील विविध प्रभागात आठवडे बाजार भागात जन आशिर्वाद पदयात्रा काढून नागरिक, व्यापारी, महिला तरुणांशी संवाद साधला आणि शहराचा सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी आपल्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटण दाबून मतदानरूपी आशिर्वाद देण्याची विनंती केली.

- Advertisement -

Rohini Khadse

यावेळी नागरिक व्यापारी सर्व स्तरातून रोहिणी खडसे यांना उस्फुर्त प्रतिसाद लाभला. शहराच्या विकासासाठी आम्ही सोबत असल्याचा नागरिकांनी रोहिणी खडसे यांना विश्र्वास दिला. यावेळी नागरिकांसोबत संवाद साधताना ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या, आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून शहरात अनेक विकास कामे झालीत त्यांनी शहरवासीयांना जो शब्द दिला तो पाळला. याउलट मागील निवडणुकीत विविध आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी पाच वर्षात आश्वासनांची पूर्ती केली नाही.

- Advertisement -

आ एकनाथराव खडसे, रविंद्र भैय्यासाहेब पाटिल आणि जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लढत असलेल्या या निवडणुकीत आपण मतदानरूपी आशिर्वाद देऊन सेवेची संधी दिल्यास, शहरातील रखडलेल्या विकास कामांचे निराकरण करून पाणी पुरवठा योजना, रस्ते, व इतर समस्या मार्गी लावून शहराचा विकास आराखडा तयार करुन, मूलभूत सुविधांचे निर्माण करून शहराचा सर्वांगिण विकास घडवून नियोजनबध्द स्वच्छ सुंदर शहराचे निर्माण करण्याची रोहिणी खडसे यांनी मतदारांना ग्वाही दिली.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Fadnavis Support Pawar, Thackeray | फडणवीसांचा पवार-ठाकरेंना फोन, राजकीय...

Fadnavis Support Pawar, Thackeray | साक्षीदार न्यूज | जगदीप धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी...

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

RECENT NEWS