आमदार सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान द्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

रयत क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज आबाचने यांची मागणी.

- Advertisement -

धाराशिव (साक्षीदार न्युज) ; –  माजी कृषी राज्यमंत्री शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांना महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे, अशी मागणी रयत क्रांती पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सुरज आबाचने यांनी केले

महायुतील घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटना व रयत क्रांती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत गेल्या दहा वर्षांपासून महायुती मध्ये निष्ठेने काम करीत आहेत. महायुतीतील अनेक उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खा. धैर्यशील माने यांना १९ व २०१४ ला निवडणूक आणण्यासाठी आ. सदाभाऊ खोत यांच्या सिंहांचा वाटा आहे. तसेच नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिराळा व जत विधानसभा मतदारसंघातून आ. सत्यजित देशमुख व आ. गोपीचंद पडळकर यांना निवडून आणण्यासाठी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे.
शेतकरी, शेतमजूर, कामगार नेते अशी त्यांची ओळख आहे. आमदार सदाभाऊ खोत महायुतीच्या सरकारचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे आमदार सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

निश्चितपणे एका शेतकरी नेत्याला महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये मंत्रिपदावर बसवून महायुतीचे सर्व नेते शेतकरी शेतमजूर कामगार व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करतील अशी अपेक्षा रयत क्रांती पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सुरज आबाचने यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS