महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांचे मतदारांना आवाहन; पाचोरा तालुक्यात ठिकठिकाणी जंगी स्वागत
Give Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena पाचोरा (साक्षीदार न्युज ) : – जळगाव लोकसभा मतदार संघात तुम्ही अनेकवेळा भाजपाला संधी दिली. मात्र, त्यांनी एकही चांगली योजना, कामे जिल्ह्यात आणले नाही. त्यांची सत्ता असलेल्या जिल्हा दूध विकास संघ, जिल्हा बँकेत काय मनमानी सुरू आहे. बलून बंधारे बंधारे बांधू असे आश्वासन दिले होते, आता कुठे गेले ते बलून बंधारे असा प्रश्न उपस्थित करून मतदारांना दिलेले एकही आश्वासन भाजप पूर्ण करू शकलेली नाही. आणि आता हे जनतेच्या देखील लक्षात आले आहे. त्यामुळे जनतेने ही निवडणूक हातात घेतली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला एकदा संधी द्या, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एकदा संधी द्या, असे आवाहन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी केले.

करणदादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त मंगळवार, दि.३० रोजी पाचोरा तालुक्यातील शिंदाड, वाडी शेवाळे, सातगाव डोंगरी, खडकदेवळा, तारखेडा, हनुमंतवाडी, गाळण, बाळ, लोहटार यांसह विविध गावांना प्रचार रॅली काढून कॉर्नर बैठक घेण्यात आल्या. या प्रचार रॅलींना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभून मतदान करणार तर ‘मशाल’लाच असा निर्धार ग्रामस्थांनी केला. प्रत्येक गावात करणदादा पाटील यांचे गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार स्वागत केले. रॅली, कॉर्नर बैठकीदरम्यान, करणदादा पाटील यांनी, एक नंबरवरील मशाल चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
रॅलीत, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, प्रा. अस्मिता पाटील, विभाग प्रमुख आप्पा महाजन, युवासेनेचे उप तालुकाध्यक्ष सागर पाटील, माजी सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे, जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पाचोरा तालुका प्रमुख शरद पाटील, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर चौधरी, पाचोरा शहरप्रमुख अनिल सावंत, जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, ॲड. अभय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, माजी सरपंच देविदास वाघ, रा. कॉ. तालुका उपाध्यक्ष रघुनाथ हिरे, सातगाव डोंगरी विकासोचे चेअरमन भागवत पाटील, दूध संघाचे चेअरमन शंकर पवार, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर पाटील जाकीर तडवी, उपसरपंच याकूब इस्माईल, माजी सरपंच भगवान मंडळे, ग्रामपंचायत सदस्य भिला पवार, आबा पाटील राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे संजय तडवी, शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, खडकदेवळा येथील शिवसेनेचे मुकेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराज पाटील, बारकू पाटील, अजय निकम, भैय्या साठे, सुदाम पाटील, प्रल्हाद पाटील, संभाजी पाटील, सुदाम ठाकरे, अनिल पाटील, हबीब कासीम, अमीत खाटीक, किरण कोळी, ओम बोरसे, शेखर पाटील, पृथ्वीराज पाटील, भूषण पाटील, विशाल पाटील, देविदास पाटील, तेजस पाटील, राहुल परीट, मयूर पाटील, रोहन राजपूत, भिकन तुपे, संतोष पाटील, उत्तम पाटील, राजेंद्र पाटील, डॉ. मयूर पाटील, करण राजपूत, आनंदसिंग राजपूत, अमोल पाटील, सरपंच राजेंद्र सावंत, राहुल रानडे, सतीश रानडे यांसह शेकडो, कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.