महिलेच्या पर्समधून सोन्याचे मंगळसुत्र व रोकड टॉवर चौकातुन लांबविली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ; – महिलेच्या पर्समधून रोख रक्कम आणि सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण ६३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील शास्त्री टॉवर चौकात शुक्रवारी ५ जानेवारी रोजी दुपारी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

सुलोचना काशिनाथ चौधरी (वय-६६) रा.कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर या महिला कामाच्या निमित्ताने शुक्रवारी ५ जानेवारी रोजी जळगाव शहरात खरेदी करण्यासाठी आलेल्या होत्या. दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरातील टॉवर चौकात मधील जावळेकर कचोरीच्या दुकानासमोर उभे असताना त्यांच्या पर्समधून सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम असा एकूण ६३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चोरट्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर रात्री ८ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Gold Mangalsutra

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS