Gold Price साक्षीदार न्युज । सोनं खरेदी करण्याची योजना आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची ठरू शकते. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली असून, ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोमवारी भाव कमी झाल्यानंतर मंगळवारी, 8 एप्रिल 2025 रोजीही सोन्याचे दर खाली आले आहेत.
Good Returns या वेबसाइटनुसार, आज 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 650 रुपयांची घट झाली आहे. यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 89,880 रुपये झाला आहे, तर 100 ग्रॅम सोन्याची किंमत 8,98,800 रुपये इतकी नोंदवली गेली आहे. दुसरीकडे, 22 कॅरेट सोन्याचा भावही कमी झाला असून, 10 ग्रॅम सोन्याचा दर 82,400 रुपये आहे.
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
- 1 ग्रॅम: 8,240 रुपये
- 8 ग्रॅम: 65,920 रुपये
- 10 ग्रॅम: 82,400 रुपये
- 100 ग्रॅम: 8,24,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
- 1 ग्रॅम: 8,988 रुपये
- 8 ग्रॅम: 71,904 रुपये
- 10 ग्रॅम: 89,880 रुपये
- 100 ग्रॅम: 8,98,800 रुपये
प्रमुख शहरांमधील सोन्याचा भाव (1 ग्रॅम)
- मुंबई: 22 कॅरेट – 8,225 रुपये | 24 कॅरेट – 8,973 रुपये
- पुणे: 22 कॅरेट – 8,225 रुपये | 24 कॅरेट – 8,973 रुपये
- नाशिक: 22 कॅरेट – 8,228 रुपये | 24 कॅरेट – 8,976 रुपये
- नागपूर: 22 कॅरेट – 8,225 रुपये | 24 कॅरेट – 8,973 रुपये
- जळगाव: 22 कॅरेट – 8,225 रुपये | 24 कॅरेट – 8,973 रुपये
- सोलापूर: 22 कॅरेट – 8,225 रुपये | 24 कॅरेट – 8,973 रुपये
- छत्रपती संभाजी नगर: 22 कॅरेट – 8,225 रुपये | 24 कॅरेट – 8,973 रुपये
- वसई-विरार: 22 कॅरेट – 8,228 रुपये | 24 कॅरेट – 8,976 रुपये
- भिवंडी: 22 कॅरेट – 8,228 रुपये | 24 कॅरेट – 8,976 रुपये
- अमरावती: 22 कॅरेट – 8,225 रुपये | 24 कॅरेट – 8,973 रुपये
सोन्याच्या किमतीत झालेली ही सततची घसरण ग्राहकांसाठी खरेदीची संधी ठरत आहे. बाजारातील तज्ज्ञांचे मत जाणून घेण्यासाठी आणि सोन्याच्या किमतींवर नजर ठेवण्यासाठी ग्राहक उत्सुक आहेत. तुम्हीही सोनं खरेदीचा विचार करत असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो!