तुम्ही अमेझॉनवरन काही शोधताय का ?
यावर कराल क्लिक
Gold Today Rate साक्षीदार न्युज । 14 एप्रिल 2025 । लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या किंमतीत काहीशी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटी सोन्याचे दर काहीसे वाढले होते, परंतु आज, सोमवारी (14 एप्रिल 2025), बाजारात सोन्याच्या किंमतीत कपात दिसून आली. यामुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
बाजारातील माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे 160 रुपयांची घट झाली आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 95,660 रुपये आहे, तर 100 ग्रॅम सोन्याची किंमत 9,56,600 रुपये आहे. त्याचप्रमाणे, 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 9,566 रुपये आहे.
22 कॅरेट सोन्याच्या किंमतीतही घसरण दिसून येत आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव आज 87,700 रुपये आहे, तर 1 ग्रॅम सोन्याचा दर 8,770 रुपये आहे. 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 8,77,000 रुपये इतकी आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर (1 ग्रॅम)
मुंबई: 22 कॅरेट – 8,755 रुपये, 24 कॅरेट – 9,551 रुपये
पुणे: 22 कॅरेट – 8,755 रुपये, 24 कॅरेट – 9,551 रुपये
नाशिक: 22 कॅरेट – 8,758 रुपये, 24 कॅरेट – 9,554 रुपये
नागपूर: 22 कॅरेट – 8,745 रुपये, 24 कॅरेट – 9,540 रुपये
छत्रपती संभाजीनगर: 22 कॅरेट – 8,755 रुपये, 24 कॅरेट – 9,551 रुपये
सोलापूर: 22 कॅरेट – 8,755 रुपये, 24 कॅरेट – 9,551 रुपये