Gold Price Today | सोन्याच्या दरांनी पुन्हा विक्रम मोडला आहे. 24K, 22K, 18K सोन्याचे आजचे दर मुंबई, पुणे, जळगावसह देशभरात किती आहेत? सविस्तर माहिती वाचा.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Gold Price Today |  साक्षीदार न्यूज | मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून, सराफा बाजारात दररोज नवे उच्चांक पाहायला मिळत आहेत. आजही बाजार उघडताच सोन्याने दरवाढीचा नवा रेकॉर्ड नोंदवला आहे. ऐन लग्नसराईच्या काळात सोनं अधिक महाग झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये चिंता आणि नाराजीचे वातावरण आहे.

- Advertisement -

आज देशांतर्गत बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतिग्रॅम १२० रुपयांची वाढ झाली असून, हा दर १४,१२२ रुपये प्रतिग्रॅम झाला आहे. त्यामुळे १० ग्रॅम (एक तोळा) सोनं तब्बल १,२०० रुपयांनी महागलं आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक किंमत मानली जात आहे.

२२ कॅरेट सोन्याचाही दर वाढला असून, आज तो १२,९४५ रुपये प्रतिग्रॅम इतका झाला आहे. यामध्ये प्रतिग्रॅम ११० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे १८ कॅरेट सोन्याचा दरही वाढून १०,५९२ रुपये प्रतिग्रॅम झाला असून, यामध्ये ९० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

- Advertisement -

10 ग्रॅम सोन्याचे दर

  • 24 कॅरेट: ₹1,41,220

  • 22 कॅरेट: ₹1,29,450

तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील अस्थिरता, डॉलरमधील चढउतार आणि देशांतर्गत लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आजचे सोन्याचे दर

  • Mumbai / Pune / Jalgaon
    24K – ₹14,122 | 22K – ₹12,945

  • Delhi
    24K – ₹14,137 | 22K – ₹12,960

  • Chennai
    24K – ₹14,182 | 22K – ₹13,000

  • Bengaluru / Hyderabad
    24K – ₹14,122 | 22K – ₹12,945

सोन्याच्या या वाढत्या दरांमुळे दागिने खरेदीचा निर्णय अनेक ग्राहक पुढे ढकलताना दिसत आहेत.

बँकिंग क्षेत्रात खळबळ! पंजाब नॅशनल बँकेत 2434 कोटींचा लोन घोटाळा उघड

जागा वाटपावरून शिवसेना युतीमधून बाहेर पडणार का ? शिंदे गटाने दिला अल्टिमेटम

“रुग्णवाहिका अडकली, पोलीस निघून गेले! निवृत्त पोलिसांनीच वाचवला खॉजामिया चौक”

अजित दादा भाजप बरोबर नाही

मित्रांनीच केला खून, मृतदेह पोत्यात बांधून धरणात टाकला

Gold Price Today

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS