- Gold Price Today सोन्याच्या भावातील वाढ
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.
३१ जानेवारी (शुक्रवार) रोजी सोन्याचा भाव १,००० रुपयांनी वाढून १० ग्रॅम सोन्याचा भाव ८२,७०० रुपयांवर (जीएसटीसह ८५,१८१ रुपये) पोहोचला.
चार दिवसांत सोन्याच्या भावात २,१०० रुपयांची वाढ झाली आहे.- जानेवारी महिन्यात सोन्याने गुंतवणूकदारांना ५,८०० रुपयांचा परतावा दिला आहे.
- Advertisement -
- १ जानेवारीला सोन्याचा भाव ७६,९०० रुपये होता, तो ३१ जानेवारीला ८२,७०० रुपयांवर पोहोचला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणाचा सोन्याच्या भावावर परिणाम झाल्याचे जाणकारांचे मत आहे.
- चांदीच्या भावातील वाढ
चांदीचा भावही शुक्रवारी १,००० रुपयांनी वाढून ९५,००० रुपये प्रति किलो (जीएसटीसह ९७,८५० रुपये) झाला.
मंगळवारी चांदीचा भाव ९२,००० रुपये प्रति किलो होता, तो दररोज १,००० रुपयांनी वाढत शुक्रवारी ९५,००० रुपयांवर पोहोचला.
यापूर्वी चांदीचा भाव १ लाख रुपये प्रति किलोचा विक्रमी टप्पा गाठला होता. -
Gold Price Today
- Advertisement -