Gold Silver Price Today | सोन्याने तोडला विक्रम, चांदीने इतिहास घडवला! दरवाढीने गुंतवणूकदार हैराण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Gold Silver Price Today | साक्षीदार न्यूज | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजारात सोन्या-चांदीने जबरदस्त उसळी घेतली आहे. सोमवारी झालेल्या या दरवाढीमुळे दोन्ही मौल्यवान धातूंनी पुन्हा एकदा नवे उच्चांक गाठले आहेत. सुरुवातीला किरकोळ वाढ अपेक्षित असतानाच प्रत्यक्षात दरांनी वेगळीच झेप घेतली आहे.

- Advertisement -

२०२६ सुरू होऊन काही आठवडे उलटले असले तरी सोन्या-चांदीच्या दरवाढीचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही. आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढता कल यामुळे बाजारात मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. त्याचा थेट परिणाम दरांवर होत असून, किमती अक्षरशः बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे जात आहेत.

दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर प्रथमच तीन लाखांचा टप्पा ओलांडत प्रति किलो ३ लाख २ हजार ६०० रुपयांवर पोहोचले आहेत. एका दिवसात तब्बल १० हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. मागील आठवड्यात बाजार बंद होताना चांदीचे दर २ लाख ९२ हजार ६०० रुपये प्रति किलो इतके होते.

- Advertisement -

दरम्यान, सोन्यानेही आपली चमक कायम ठेवत नवा विक्रम नोंदवला आहे. ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ हजार ९०० रुपयांनी वाढून १ लाख ४८ हजार रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवारी हा दर १ लाख ४६ हजार २०० रुपये होता.

सराफा व्यावसायिकांच्या मते, देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवर वाढलेली मागणी, आर्थिक मंदीची भीती आणि अस्थिर जागतिक परिस्थिती यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे वळत आहेत. याच कारणांमुळे या धातूंच्या किमतींमध्ये सातत्याने मोठी वाढ होत असल्याचे चित्र आहे.

उमेदवार,महिला,कार्यकर्ते यांयाच्यावर पोलिसांचा जोरदार लाठीमार 
मतदान केंद्रावर पोलिस आणि उमेदवारासह कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राढा
जळगांवात पैशाच्या वादातून झाला गोळीबार
जळगांव मतदान केंद्रावर मतदाराचे ब्रेन वॉश ?

नातवाच्या खांद्यावर हात, डोळ्यात अश्रू आणि अपक्ष उमेदवारी मागे गुपित काय ?

जळगांव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ 22 लाख रुपयाचा विषय काय ?

Gold Silver Price Today 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS